धक्कादायक : 'पेंग्विन'वर बलात्कार करून 'सील'नं बनवलं भक्ष्य!

बलात्कार केवळ मानव जातीमध्ये होतो... पशू-पक्षी-प्राणी याला अपवाद असतात, असाच कित्येकांचा समज चुकीचा ठरलाय... या समजुतीला फेटाळून लावणारे काही धक्कादायक फोटो समोर आलेत. 

Updated: Nov 19, 2014, 11:14 PM IST
धक्कादायक : 'पेंग्विन'वर बलात्कार करून 'सील'नं बनवलं भक्ष्य! title=

नवी दिल्ली : बलात्कार केवळ मानव प्राण्यांमध्येच होतो... पशू-पक्षी-प्राणी याला अपवाद असतात, असाच कित्येकांचा समज चुकीचा ठरलाय... या समजुतीला फेटाळून लावणारे काही धक्कादायक फोटो समोर आलेत. 

या फोटोंमध्ये, समुद्री जीव असणारा सील एका पेंग्विनवर बलात्कार करताना दिसतोय... हे फोटो समोर आल्यानंतर अभ्यासकांनाही धक्का बसलाय.

संशोधन पत्र असलेल्या ‘पोलर बायोलॉजी’मध्ये नुकत्याच छापलेल्या एका अहवालात हे फोटो छापले गेलेत. यूनिव्हर्सिटी ऑफ प्रिटोरियाच्या काही संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी ‘सील’ला पेंग्विनच्या समूहावर हल्ला करताना आणि त्यांच्याशी जबरदस्तीनं लैंगिक संबंध प्रस्थापित करताना पाहिलंय. हीच दृश्यं त्यांनी कॅमेऱ्याच्या साहाय्यानं टिपलीत... इतकंच नव्हे, तर ही घटना एकदाच नाही तर चार – चार वेळा पाहिल्याचाही दावा त्यांनी केलाय. 


सील पेंग्विन खाताना

हे सगळे सील नर होते... तर या फोटोंमध्ये दिसणाऱ्या पेंग्विनचं लिंग मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. या पेंग्विनवर आपली लैंगिक भूक भागवल्यानंतर या ‘सील’नं त्यांच्यावर तावही मारला... ते हे पेंग्विन खातानाही दिसले.

हे फोटो अंटार्टिकाच्या मारियन बेटावरील आहेत. यावेळी, ‘सील’समोर क्षरणागती पत्करण्याशिवाय पेंग्विन्सजवळ दुसरा कोणताही मार्ग नव्हता. 

अशीच एक घटना २००६ मध्येही समोर आली होती, असं मेल ऑनलाईनमध्ये एका बातमीत म्हटलं गेलंय. ‘सील’ची ही वर्तवणूक नैसर्गिक नसून ‘शिकलेली’ असू शकते, असही यात म्हटलं गेलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.