देहदंडातून 'त्या' मच्छिमारांची सुटका; श्रेय मोदी सरकारचं - भाजप

श्रीलंकेनं कथित स्वरुपात मादक पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांची बुधवारी सुटका केलीय. 

Updated: Nov 19, 2014, 08:29 PM IST
देहदंडातून 'त्या' मच्छिमारांची सुटका; श्रेय मोदी सरकारचं - भाजप title=

नवी दिल्ली : श्रीलंकेनं कथित स्वरुपात मादक पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांची बुधवारी सुटका केलीय. 

भारतीय मच्छिमारांच्या या सुटकेचं श्रेय मोदी सरकारचं असल्याचं भाजपनं म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, श्रीलंकेत देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांच्या सुटकेसाठी तामिळनाडूच्या मच्छिमारांच्या एका प्रतिनिधी मंडळानं मंगळवारी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी केंद्रानं या बाबतीत हस्तक्षेप करण्याची मागणी स्वराज यांच्याकडे केली होती. 

या प्रतिनिधी मंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते परिवहन, राजमार्ग आणि जहाजरानी मंत्री पोन राधाकृष्णन हेदेखील सहभागी होते. या प्रतिनिधी मंडळानं जवळपास ९० मिनिटांपर्यंत चर्चा केली. यावेळी, त्यांनी श्रीलंकन अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या जहाजांनाही सोडण्यासाठी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली.

या बैठकीनंतर, मच्छिमारांना भारतात परत आणण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचं राधाकृष्णन यांनी म्हटलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.