रशियाचा सीरियामध्ये आतापर्यंत मोठा जोरदार हवाई हल्ला

सिरियात आजपर्यंत सर्वात मोठा हवाई हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियाने केलाय. याचवेळी जिहादींनी हल्ल्याला उत्तर देताना दमिश्क येथील रशियाच्या दुतावार कार्यालयावल रॉकेटने हल्ला चढविला.

Reuters | Updated: Oct 14, 2015, 10:22 AM IST
रशियाचा सीरियामध्ये आतापर्यंत मोठा जोरदार हवाई हल्ला  title=

बेरुत : सिरियात आजपर्यंत सर्वात मोठा हवाई हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियाने केलाय. याचवेळी जिहादींनी हल्ल्याला उत्तर देताना दमिश्क येथील रशियाच्या दुतावार कार्यालयावल रॉकेटने हल्ला चढविला.

रशिया आणि सिरिया यांच्यात संघर्ष वाढत आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेवर आरोप केलाय. रशियाबरोबर सहकार्य करण्यास अमेरिका राजी नाही. मॉस्कोत रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले, गेल्या २४ तासांमधील हवाई सेनेची मोठी कारवाई आहे. ८६ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरला सुरुवात करण्यात आलेल्या कारवाई मोहीमेतील एका दिवसातील ही मोठी कारवाई आहे.

संरक्षम मंत्रालयाने सांगितले, हवाई सेनेने इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनांना हड्ड्यांवर हे हल्ले चढविण्यात आलेत. रशियाने म्हटलेय, इस्लामिक स्टेटला टार्गेट केले आहे. आज सिरियात रशिया सैन्य घुसविण्याचा तयारीत आहे. रशियाचे आभार व्यक्त करण्यासाठी समर्थक लोकांची रॅली काढण्यात येत आहे. मात्र, कट्टर दहशतवाद्यांनी रशियाचा दुतावासावर रॉकेट हल्ला केला. पहिल्या रॉकेट हल्ल्याच्यावेळी परिशरात धुरांचे लोट पसरलेत. त्यानंतर लोकांनी पळ काढला. मात्र, दुसऱ्या रॉकेट हल्ल्यात कोणतेही नुकसान झालेले नाही, असे रशियाने म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.