जकार्ता : जकार्तामध्ये एका व्यक्तीने एका विचित्र आणि जीवाचा थरकाप उडविणाऱी घटना घडवून आणली आहे. एका लग्न झालेल्या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे लिंग कापले आणि डिनरमध्ये त्या व्यक्तीचे लिंग शिजवून खाल्ल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे.
ही घटना लैपुंग येथे लग्नाच्या पहिल्या रात्री ३० वर्षीय रुडी इफेंडी याला समजले की त्याची पत्नी व्हर्जिन नाही आहे. त्याने आपल्या पत्नीकडे कौमार्य भंगाचे स्पष्टकरण मागितले. त्यानंतर पत्नी नुरियाने सांगितले की, लग्नापूर्वी त्याच्यावर बलात्कार झाला होता. एका व्यक्तीसोबत ती डेटवर गेली होती. त्यानेच तिच्यावर रेप केला.
ईफेंडी याने पत्नीला सांगून रेपिस्टला फोन करून घरी बोलावले. रेपिस्ट नुरियाला भेटायला घरी आला. ईफेंडी याने त्याचा खून केला आणि त्याला जाळून टाकले. असे कण्या पूर्वी त्याचे गुप्तांग कापले .
frontpagemag.com या वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार ईफेंडी याने पत्रकारांना सांगितले की असे करून तो आपल्या मनातील दुःख कमी करू इच्छित होता. यानंतर आपल्या २० वर्षीय पत्नीला रेपिस्टचे लिंग शिजवायला सांगितले आण त्याच्या पत्नीला सोबत घेऊन ते खाण्यास लावले.