पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल

 ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल झालेत. आजपासून या परिषदेला सुरुवात होतेय. मोदींसह ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र असलेल्या ब्राझिल, रशिया, चिन आणि दक्षिण आफ्रिकाचे अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत.

Updated: Jul 15, 2014, 01:12 PM IST
 पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल title=

ब्राझील : ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल झालेत. आजपासून या परिषदेला सुरुवात होतेय. मोदींसह ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र असलेल्या ब्राझील, रशिया, चिन आणि दक्षिण आफ्रिकाचे अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत.

मोदींनी सर्वप्रथम चिनचे अध्यक्ष शी शिनपिंग यांची भेट घेतली. फोर्टेलिझा येथे तब्बल 80 मिनिटे या दोघांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. व्यापार, पर्यटन, दहशवाद आणि सीमा प्रश्नांवर त्यांच्यात चर्चा झाली. सप्टेंबर महिन्यात भारतात येण्यासाठी मोदींनी शिनपिंग यांना आमंत्रण दिलं असून नोव्हेंबरमध्ये मोदींना चीन भेटीचं आमंत्रण शिनपिंग यांनी दिलं. उभय देशांमधील संबंध सुधारण्यासाठी या बैठकीला मोठं महत्व आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरच्या पहिल्याच सर्वात मोठ्या बैठकीत सहभागी होत आहेत. त्यामुळं सर्वांच्या नजरा नरेंद्र मोदींच्या ब्राझील दौ-यावर टीकल्या आहेत. ब्रिक्स देशांच्या विचाराधीन असलेल्या बँकेमध्ये पाचही देशांची समान भागिदारी असावी, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी धरणार आहेत.

वर्ल्ड बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये अमेरिका, जपानची मक्तेदारी चालते.भावी ब्रिक्स बँकेमध्ये ही चूक टाळायची असेल, तर सर्व देशांची समान गुंतवणूक असावी, अशी भारताची भूमिका आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.