पाकिस्तानचा निर्लज्जपणा, बुरहान वानीला शहीद दर्जा

पाकिस्तानच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशदवादी बुरहान वानीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद दर्जा दिला आहे.

Updated: Jul 15, 2016, 07:25 PM IST
पाकिस्तानचा निर्लज्जपणा, बुरहान वानीला शहीद दर्जा title=

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशदवादी बुरहान वानीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद दर्जा दिला आहे. काश्मीरमधला हिसांचाराविरोधात 19 जुलैला काळा दिवस पाळणार असल्याचंही शरीफ म्हणाले आहेत. 

काश्मीरी जनतेला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 19 जुलै काळा दिवस पाळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. काश्मीरमधल्या या प्रकरणाचा आवाज आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलण्याचंही नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सांगतिलं आहे. 

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीचं एन्काऊंटर करण्यात आलं, यानंतर काश्मीरमधलं वातावरण अजूनही तापलेलं आहे. आत्तापर्यंत काश्मीरमध्ये 36 जणांचा मृत्यू झालाय, यामध्ये एका पोलिसाचा समावेश आहे, तर 3140 जण जखमी झालेत, ज्यातले 1500 पोलीस आहेत.