मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आयसीसीची विरोधक आहे आणि हिंसेचं कुठलही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण डॉ. झाकीर नाईकनं दिलंय. शिवाय आत्मघातकी हल्ले इस्लामविरोधी असल्याचंही सांगताना युद्धात असे हल्ले योग्य असल्याचं मत झाकीर नाईकनं आज सौदी अरेबियातून व्यक्त केलं.
मी आणि माझं चॅनल काहीही चुकींच करत नसल्याचंही झाकीर नाईकनं म्हटलंय. बांग्लादेशात झालेल्या हल्ल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला डॉ. झाकीर नाईक सौदी अरेबियामधून स्काईपवरून प्रथमच पत्रकारांसमोर आला. या पत्रकार परिषदेत माजी पोलीस अधिकारी शमशेर खान, प्रसिद्ध वकील मोबीन सोलकर आणि झाकीर नाईकच्या संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. झाकीर नाईकच्या फेसबूक पेजला चार कोटी वीस लाख लाईक्स असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.