नवी दिल्ली : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर कमांडर झकीउर रहमान लखवी याला पाकिस्तानच्या एका न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भारताकडून पाकवर दबाव टाकण्यात आला होता. दहशवाद संपवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं लखवीला जामीन देऊन दुटप्पी भूमिका स्वीकारली होती. पेशावर हल्ल्यानंतरही हे पाऊल उचलणाऱ्या पाकिस्तानवर भारतानं टाकलेल्या दबावाचा परिणाम दिसून आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, जामीन मिळाल्यानंतरही नखवीची तुरुंगातून सुटका होणार नाहीय. कारण, लष्कर कमांडर लखवीला आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आलीय. शांती भंग करण्याच्या आरोपाखाली लखवी जेलमध्येच राहणार आहे. पाकिस्तान सरकार आज लखवीच्या जामीनाला हायकोर्टात आव्हान देणार आहे.
२६/११च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी झकीर उर रेहमान लखवी आणि अन्य सात जणांविरोधात पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयात खटला सुरु आहे. याप्रकरणी पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी लखवी, अब्दूल वाजीद, मझहर इक्बाल, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद आणि युसूफ अंजूम यांना २००९मध्ये अटक केली होती.
या सर्वांविरोधात मुंबई हल्ल्यांचा कट रचणं, आर्थिक सहाय्य करणं अशा विविध कलमांखाली खटला सुरु आहे. याप्रकरणातील झकीर उर रेहमान लखवीला गुरुवारी पाकिस्तानमधील कोर्टानं पाच लाख रुपयांच्या बाँडवर जामीन मंजूर केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.