पाक मुख्य सचिव बशीर सुवर्ण मंदिरात

पाकिस्तानचे मुख्य सचिव सलमान बशीर यांनी पंजाबमधील अमृतसर शहरातील सुवर्ण मंदीराला कुंटुंबियांसहीत भेट दिली. लाहोरला जाण्यापूर्वी बशीर आणि त्यांच्या कुंटुंबियांनी सुवर्ण मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 4, 2012, 08:33 AM IST

www.24taas.com, अमृतसर
पाकिस्तानचे मुख्य सचिव सलमान बशीर यांनी पंजाबमधील अमृतसर शहरातील सुवर्ण मंदीराला कुंटुंबियांसहीत भेट दिली. लाहोरला जाण्यापूर्वी बशीर आणि त्यांच्या कुंटुंबियांनी सुवर्ण मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली.
8 सप्टेंबर रोजी इस्लामाबाद येथे विदेश मंत्रालयाची बैठक होणार आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी विदेशमंत्री एस. एम. कृष्णा आणि पाकिस्तानी विदेशमंत्री हिना रब्बानी यांच्यात ही बैठक होणार आहे. ही बैठक यशस्वी होईल असा विश्वास बशीर यांनी व्यक्त केलाय. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांची भेट झाली होती.
यापूर्वी गेल्याच महिन्यात पेशावरचे डेप्युटी ऍटर्नी जनरल मोहम्मद खुर्शीद यांनीही सुवर्ण मंदिराला भेट दिली होती. मात्र, सर्वधर्मसमभावाचं दर्शन घडवण्यासाठी भारतातील सुवर्ण मंदिरात लोकांचे जोडे साफ केल्यामुळे पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्यावर टीका झाली आणि त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं.