पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड, करावी लागली सारवासारव

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालाय. यावेळी पाकिस्तानचा बुरखा त्यांच्याच मंत्र्यांना फाडलाय. मार्च महिन्यात बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आलेला कुलभूषण जाधवच्या हेरगिरीचे पुरावेच नसल्याची कबुली पाकिस्तानी पंतप्रधानाचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.

PTI | Updated: Dec 8, 2016, 03:47 PM IST
पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड, करावी लागली सारवासारव title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालाय. यावेळी पाकिस्तानचा बुरखा त्यांच्याच मंत्र्यांना फाडलाय. मार्च महिन्यात बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आलेला कुलभूषण जाधवच्या हेरगिरीचे पुरावेच नसल्याची कबुली पाकिस्तानी पंतप्रधानाचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जाधव यांच्यासंबंधी आणि त्यांच्या पाकिस्तानमधील दहशतवादी कृत्यांच्या सहभागासंबंधी जे डॉसियर तयार करण्यात आले आहे, त्यात फक्त विविध व्यक्तींचे जबाब आहेत, असं अझीझ यांनी म्हटले. पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार कुलभूषण जाधवला बलुचिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपावरुन अटक करण्यात आली.

मात्र जाधव हा बिझनेसमेन असून इराणमध्ये व्यवसाय करत असल्याचे भारताने त्याचवेळी स्पष्ट केलं होते. खोटारडेपणा जगासमोर उघड झाल्यानंतर पाकिस्तानने यावर सारवासारव केली. सरताज अझीझ यांचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं पाकिस्तानानं म्हटले आहे.