www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
वय वर्ष अवघं नऊ महिने... आणि हत्येच्या प्रयत्नात ठरलाय दोषी... अशक्य कोटीतील ही गोष्ट घडलीय पाकिस्तानात
नऊ वर्षीय मुसा नामक एका चिमुकल्यावर पाक पोलिसांनी जीवघेणा हल्ला करण्याच्या घटनेतील आरोपी बनवून टाकलं... एव्हढंच नाही तर जिल्हा तसंच सत्र न्यायाधीश रफाकत अली यांच्या कोर्टात या चिमुकल्यावरील हे आरोप सिद्धही झाले. यानंतर न्यायाधीशांनी या नऊ वर्षीय मुलाला १२ एप्रिलपर्यंत जामीन दिला तसंच पोलिसांना या मुलाचा जबाब घेण्याचेही आदेश न्यायालयानं यावेळी दिलेत.
पोलिसांनी मुसा आणि त्याचे वडील अहमद यांना लाहोरच्या मुस्लिम टाऊन भागात पोलिसांवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपींचे वकील इरफान तराड यांच्या म्हणण्यानुसार, पुढच्या सुनावणीच्या वेळी या चिमुकल्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर व्हावं लागण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक राणा जब्बार यांच्या म्हणण्यानुसार, या लहानग्याला या प्रकरणात आरोपी बनविण्यासंदर्भात पोलिसांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांनी या मुलाविरुद्ध तक्रार नोंदविणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक कासिफ अहमद यांना निलंबित केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.