www.24taas.com, पीटीआय, बँकॉक
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बुधवारी एका भंगार दुकानात दुसर्या महायुद्धातील जिवंत बॉम्बचा स्फोट होऊन सात कामगार ठार झाले तर १९ जण गंभीर जखमी झाले.
२२७ कि.ग्रॅ. वजनाचा हा प्रचंड बॉम्ब तोडण्याचं काम सुरू असताना त्याचा मोठा स्फोट होऊन घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली. सात पैकी पाच कामगारांचा मृत्यू हा घटनास्थळीच झाला आणि दोघांचा हॉस्पिटलमध्ये.
बॉम्ब फुटल्यानं भंगार दुकानाजवळचा ५०० मीटरपर्यंतचा परिसराला फटका बसलाय. मृत कामगारांचे मृतदेहही २०० मीटर फेकल्या गेले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.