www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था नासामध्ये आता महिला राज दिसणार आहे. भावी अंतराळवीर महिला असणार आहेत. कारण नासाने ५० टक्के महिलांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.
नासामध्ये सोमवारी भावी अंतराळवीर कोण असतील? यासाठी एक ग्रुप करण्यात आलाय. यामध्ये निम्या महिला आहेत. नासाच्या माहितीनुसार ६,११० पैकी चार महिला आणि चार पुरूष यांची निवड करण्यात आली. त्यांना जगभरातील अंतराळ केंद्रात पाठविण्यात येणार आहे. त्यांना चांगले प्रशिक्षण देण्यात येईल.
ही टीम पृथ्वी खालील भागाचा अभ्यास, ग्रह आणि मंगल या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तिन्ही ग्रहांच्या अभ्यासाठी एक अभियान नासातर्फे सुरू करण्यात आलेय. त्यासाठी आठ जणांची निवड करण्यात आलेय.
तीन दशकांपासून अमेरिकेने अंतराळ कक्षात जाण्यासाठी आणि तेथून परत पृथ्वीवर येण्यासाठीच्या मोहीमेला स्थगिती दिली होती. आता नव्याने अंतराळ अभियान सुरू करण्यात येणार आहे. नासाचे प्रशासकीय अधिकारी चार्ल्स बोल्डेन यांनी सांगितले की, नविन अंतराळवीर नासाशी जोडले जाणार आहेत. त्यांना प्रेरणा देण्यामागे ते साहशी धाडस करणार आहेत. त्यांना त्याबाबत कल्पना आहे. त्यासाठी अंतराळात जाण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
नविन अंतराळवीरांचे वय हे ३४ ते ३९ दरम्यान असणार आहे. हॉस्टरमधील जॉन्सन स्पेस सेंटर ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये नविन अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काही ग्रह आणि मंगळ अभियानसाठी ते काम करणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.