काठमांडू : संपूर्ण सार्क परिषदेत भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एकमेकांची भेट टाळली. मात्र परिषदेच्या अखेरच्या दिवशी समारोपाच्या क्षणी या दोन्ही देशांचे पंतप्रधान एकमेकांसमोर आले. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं.
नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ हे दोन पंतप्रधान एकमेकांसमोर आल्यावर सर्व कॅमेरे या दोघांवरच स्थिरावले. मोदी शरीफ यांच्यामध्ये होते नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला. त्यांनी केलेल्या मध्यस्तीनंतर हे दोन नेते जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालण्याचं थांबवत नाही, तोपर्यंत नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात चर्चा होणार नाही, हे यापूर्वीच भारताने स्पष्ट केलय. २६-११ च्या दोषींविरोधात होणारी कारवाई जलद व्हावी, ही मागणीही भारतानं यापूर्वी केलीय.
१८व्या सार्क शिखर परिषदेच्या दुस-या दिवशी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्या मध्यस्थीनं भारत-पाक पंतप्रधानांची भेट तर झाली, मात्र ही भेट केवळ औपचारिकता पूर्ण करणारीच राहिली. ज्यावेळी नेपाळमध्ये नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हस्तोंदलन करताना दिसत होते, त्याच वेळी सीमेपलीकडून घुसखोरांच्या रुपात आलेले दहशतवादी जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये रक्तांची धुळवड खेळत होते.
मात्र खेदाची बाब ही की पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या तोंडातून दहशतवादाविरोधात एक शब्दही निघाला नाही. दहशतवाशी संबंधच नसल्याचं भासवत संपूर्ण सार्क परिषदेत शरीफ असे मूग गिळून गप्प राहिले. ज्यावेळी भारतावर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख मोदींनी केला, त्यावेळी शरिफांनी असे डोळे मिटून घेतले. एकाच व्यासपीठावर येऊनही शरिफ मोदींच्या डोळ्याला डोळाही भिडवू शकले नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.