बाल्टीमोर : बाल्टीमोर येथील एका कारागृहातील चार महिला रक्षक गर्भवती गँगस्टरकडून गर्भवती झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गँगस्टरची खूप दहशत असून मी स्वतः कायदा असल्याचे दर्पोक्ती तो करत असतो.
तावो व्हॉइट असे या अमेरिकन गँगस्टरचे नाव असून तो महिला रक्षकांवर महागड्या भेटवस्तूंची बरसात करीत असतो त्यात महागड्या गाड्या आणि डायमंड रिंगचाही समावेश आहे.
व्हाइट याने कारगृहात ड्रग्ज आणि सेलफोनची स्मग्लिंग करून सुमारे १६ हजार डॉलर कमविले असल्याची माहिती समोर येत आहे.
एफबीआयने व्हाइट याचे संभाषण टिपले त्यात तो म्हणाला, हे माझे जेल आहे. यातील सर्व गोष्टींवर माझे नियंत्रण आहे.
यात कारागृहातील चार महिला पोलीस रक्षक जेनिफर ओव्हेन्स, कॅटरा स्टिव्हनसन, कनिया ब्रुक्स आणि टीफनी लिंडर गर्भवती झाल्याचा आरोप लावण्यात आला आहे. व्हाइट जेव्हा कारागृहात होता त्यावेळी त्यांचा संबंध आला होता, असा आरोप लावण्यात येत आहे.
यातील ओव्हेन्स या महिला पोलीस रक्षकाच्या मानेवर ‘तावोन’ असा टॅटू आहे. तर स्टिव्हनसन हिच्या हातावर ‘तावोन’ असा टॅटू आहे.
कारागृह प्रशासनाने स्मिग्लिंग रिंगचा भांडाफोड केल्यानंतर १३ महिला कारगृह रक्षक, सात कैदी आणि पाच कटकारस्थान करणाऱ्यांना या प्रकरणी पकडल्यानंतर झालेल्या चौकशीत चार महिला सुरक्षा रक्षक गर्भवती असल्याची बाब उघड झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.