आंतरराष्ट्रीय बाजारात पाकच्या आंब्यांची धूम!

आंब्यांचा सीझन आता संपलाय पम तरीही बाजारात आंबे अजूनही मिळतायत. यंदा भारतीय आंब्यांना यूरोपियन यूनियननं लाल झेंडा दाखवला पण, याचा फायदा मात्र पाकिस्तानी आंबे निर्यातदारांनी चांगलाच उठवलाय.  

Updated: Aug 30, 2014, 09:04 PM IST
आंतरराष्ट्रीय बाजारात पाकच्या आंब्यांची धूम! title=

कराची : आंब्यांचा सीझन आता संपलाय पम तरीही बाजारात आंबे अजूनही मिळतायत. यंदा भारतीय आंब्यांना यूरोपियन यूनियननं लाल झेंडा दाखवला पण, याचा फायदा मात्र पाकिस्तानी आंबे निर्यातदारांनी चांगलाच उठवलाय.  

पाकिस्तानचे निर्यातदारही जगात आपले रोवण्यासाठी सज्ज झालेत. स्थानिक उत्पादकांकडून आंबे खरेदी करून हेच आंबे निर्यात करण्याचा धंदा तेजीत आहे. 

पाकिस्तानचे निर्यातदार शाकिर हुसैन सांगतात, ‘आम्हाला आयरलँडकडून ऑर्डर मिळालीय. इथून ऑर्डर मिळण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. त्यांना एका आठवड्यात दीड टन आंबे हवे आहेत’.

पाकिस्तानच्या आंब्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करून त्यांना निर्यातलायक बनविण्यासाठी ‘वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट’ पद्धती सुचवलीय. पाकिस्तान सरकारही यावर विचार करत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.