पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या

सौदी अरेबियात पतीच्या गैरहजेरीत पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून पुरुष डॉक्टरची हत्या करण्यात आली. आपली परवानगी न घेता डिलिव्हरीसाठी पत्नीच्या जवळ गेला याचा राग येऊन पतीने डॉक्टरवरची हत्या केली, असे 'गल्फ न्यूज'च्या वृत्तात म्हटलेय.

Updated: May 28, 2016, 06:13 PM IST
पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या title=

रियाध : सौदी अरेबियात पतीच्या गैरहजेरीत पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून पुरुष डॉक्टरची हत्या करण्यात आली. आपली परवानगी न घेता डिलिव्हरीसाठी पत्नीच्या जवळ गेला याचा राग येऊन पतीने डॉक्टरवरची हत्या केली, असे 'गल्फ न्यूज'च्या वृत्तात म्हटलेय.

नेमकं काय घडले?

जॉर्डनचे एक दाम्पत्य रियाधच्या किंग फहाद मेडिकल सिटी हॉस्पिटलमध्ये पत्नाच्या प्रसूतीकरिता आले होते.  मात्र तिच्या प्रसूतीच्यावेळी तिथे एकही पुरुष नको, फक्त महिला डॉक्टर असाव्यात, अशी पतीने अट ठेवली होती. ज्यावेळी महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या त्यावेळी हॉस्पिटलमध्ये एकच मुहम्मद अल जब्र हे अनुभवी पुरुष डॉक्टर उपस्थित होते. अखेर हॉस्पिटल प्रशासनाने मुहम्मद अल जब्र यांना महिलेची प्रसूती करण्यास सांगितले. जेव्हा हा प्रकार संबधित महिलेच्या पतीला समजला तेव्हा तो चिडला. पण त्यावेळी त्याने नाराजी व्यक्त करणे टाळले.

महिलेला घरी सुखरुप सोडले. त्यानंतर महिन्याभराने पती हॉस्पिटलमध्ये पुन्हा आला. पत्नीची तब्येत व्यवस्थित आहे म्हणून डॉक्टरांचे आभार मानायचे आहेत, असे सांगत त्याने डॉक्टरांना भेटण्याची विनंती केली. एका नर्ससोबत पती डॉक्टरांना भेटायला गेला. डॉक्टरांना भेटल्यावर त्यांच्यात गप्पा सुरू होत्या. मात्र अचानक त्याने खिशातून पिस्तुल काढून डॉक्टरांवर गोळ्या झाडल्या. यातच डॉक्टरांचा जागेवरच मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी लगेचच पतीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस चौकशी दरम्यान माझी इच्छा नसतांना पत्नीची डिलिव्हरी पुरुष डॉक्टरने केली म्हणून त्याला ठार केले, असे उत्तर त्याने दिले. पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कोर्टाच्या आदेशाने होईल, असे सांगितले.