चीनमधील जाहिरातीवर जगभरातून टीकेचा सूर

चीनमध्ये सध्या वर्णभेदी जाहिरातीवर सध्या जगभरातून टीका केली जातेय. जाहिरातीचा व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Updated: May 28, 2016, 02:42 PM IST
चीनमधील जाहिरातीवर जगभरातून टीकेचा सूर title=

पेइचिंग : चीनमध्ये सध्या वर्णभेदी जाहिरातीवर सध्या जगभरातून टीका केली जातेय. जाहिरातीचा व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

एका चीनी डिटर्जंट पावडरची ही ४८ सेकेंदाची जाहिरात आहे. या जाहिरातीत एका काळ्या रंगाच्या व्यक्तीला वॉशिंग मशीनमध्ये टाकले जाते आणि जेव्हा तो मशीनमधून बाहेर निघतो तेव्हा त्याचा रंग गोरा झालेला असतो.

जगभरातून या जाहिरातीवर टीका केली जातेय. मात्र चीनमध्ये या जाहिरातीचे स्वागत करण्यात आलेय. किऑबी नावाच्या डिटर्जंट उत्पादनाची ही जाहिरात आहे.