02:24PM - सरकार देश बनवत नाही, तर जनता देश बनवते. सरकारचं काम लोकांच्या मध्ये न येण्याचं आहे. सरकार लोकांच्या कामात अडथळा बनले नाहीत तर लोकांच्या भरवशावर देश पुढे जाईल.
02:20PM - आता जग शक्तीने नव्हे तर बुद्धीने चालणार आहे, यासाठी सामर्थ्यवान नागरिकांना तयार करुन जगाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताला सज्ज करायला हवे - मोदी
02:18PM - केवळ तंत्रज्ञानाद्वारे जीवन जगता येणार नाही, त्यासाठी मनुष्यबळाची नितांत गरज, ही गरज पूर्ण करण्याची क्षमता भारतामध्येच आहे - मोदी
02:17PM - भारतात मनुष्यबळ विकासाची गरज आहे - मोदी
02:15PM - प्रवाशांची संख्या वाढतेय, पण रेल्वेची संख्या वाढत नाही, रेल्वेच्या विकासासाठीच आम्ही रेल्वेमध्ये १०० परकीय गुंतवणुकीस मंजुरी दिली - मोदी
02:14PM - जगभरातील उद्योजकांनी भारतात येऊन उत्पादन करायला हवे, पण यासाठी उद्योजकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची गरज - मोदी
02:10PM - भारतात स्वच्छता वाढल्यास पर्यटनात वाढ होईल - मोदी
02:09PM - कचरा उचलणा-याला आपण कचरेवाला म्हणतो, पण प्रत्यक्षात तो साफसफाई करतो, आपल्याला हीच मानसिकता बदलायची आहे - मोदी02:08PM - परिश्रमाचा सन्मान करणे हे मी ऑस्ट्रेलियातून शिकलो - मोदी
02:06PM - शौचालय नसणे ही देशासाठी लाजीरवाणी बाब, ऑस्ट्रेलियातील भारतीयांनी त्यांच्या मूळगावी शौचालय बांधण्यासाठी मदत करावी - मोदींनी केले आवाहन
02:05PM - देशाच्या पंतप्रधानांना शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घ्यावे लागले - मोदी
02:04PM - जन धन योजनेमुळे बँकेमध्ये तब्बल ५ हजार कोटी रुपये जमा झाले - मोदी
02:01PM - व्यवस्था तीच, कार्यालयही तेच, आता फक्त कामाची पद्धत बदलली - मोदी
01:59PM - अवघ्या ९० दिवसांमध्येच आम्ही लाखो लोकांना बँक खाती उघडून दिली - मोदी
01:57PM - जन धन योजनेंतर्गत आम्ही गरिबांना बँक खाती उघडून देण्याचा निर्धार केला आहे - मोदी
01:54PM - मला छोटी छोटी काम छोट्या लोकांना मोठं करण्यासाठी करायची आहेत - मोदी
01:50PM - भारतीय जगात जिथे असतील तिथे त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन काम करावे - मोदी
01:48PM - भारतीय वंशाच्या लोकांनी विविध क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाचा झेंडा रोवला, हीच आपली ताकद - मोदी
01:46PM - १९६४ च्या ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व एका भारतीय वंशाच्या खेळाडूने केले होते - मोदी
01:44PM - ऑस्ट्रेलियातील नागरिकांना भारतीय आपलेसे वाटतात - मोदी
01:41PM - भारताकडे अफाट उर्जा - मोदी
01:39PM - भारतमातेकडे अडीचशे कोटी हात असून यातील निम्म्याहून अधिक हात हे तरुण आहेत - मोदी
01:37PM - लोकशाही हा दोन्ही देशांना जोडणारा महत्त्वाचा दुवा - मोदी
01:36PM - ऑस्ट्रेलिया आणि भारतात क्रिकेटशिवाय जगता येत नाही, या दोन्ही देशांना क्रिकेटने जोडले, पण ऐतिहासिक घटना आणि सांस्कृतिक परंपरेनेही दोन्ही देशांना जोडले आहे - मोदी
01:35PM - सध्या अवघ्या काही तासांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचता येते, पण भारताच्या पंतप्रधानांना इथे येण्यासाठी २८ वर्ष लागली - मोदी
01:34PM - देशासाठी जगण्याचा निर्धार करा, हाच भाव भारताच्या सव्वाशे कोटी जनतेच्या मनातही निर्माण झाला आहे - मोदी
01:33PM - आम्हाला भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची संधी मिळाली नाही, पण देशासाठी जगू तर शकतो - मोदी
01:30PM - सिडनीतील हे दृष्य भारताचे प्रतिबिंब दाखवत आहे - नरेंद्र मोदी
01:28PM - ऑस्ट्रेलियात मिळालेलं प्रेम, सन्मान मी भारतीयांना समर्पित करतो - मोदी
01:18PM - दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात.
01:22PM - सिडनीतील ऑलफॉन्स अरिना इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जोरदार स्वागत, थोड्याच वेळात सुरू होणार भाषण
सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीमध्ये दाखल झालेत. त्यांची आज सिडनीच्या जगप्रसिद्ध ऑलफोन्स अरेनामध्ये जाहीर सभा होणार आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास हा कार्यक्रम सुरू होईल. १७ हजारांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये आताच २० हजारांच्यावर तिकीटं विकली गेलीयेत आणि तितकीच वेटिंग लिस्ट आहे.
ऑस्ट्रेलियामध्येही मोदींचा करिष्मा पहायला मिळतोय. या कार्यक्रमाबाबत ऑस्ट्रेलियातल्या भारतीय नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.