उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गायब!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गेल्या सात महिन्यांपासून गायब असल्याची चर्चा तेथे जोरदार रंगतेय. किम जोगची पत्नी गायब होण्यामागे अनेक कयास लावले जात आहेत. 

Updated: Nov 7, 2016, 10:07 AM IST
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गायब! title=

प्योनगँग : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गेल्या सात महिन्यांपासून गायब असल्याची चर्चा तेथे जोरदार रंगतेय. किम जोगची पत्नी गायब होण्यामागे अनेक कयास लावले जात आहेत. 

किम जोगच्या पत्नी रि सोलू जू यांना शेवटचे 28 मार्चला बघितले गेल्याचे सांगितले जातेय. त्यानंतर मात्र त्या अद्याप दिसलेल्या नाहीत. रि सोलू जू यांना त्यानंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात पाहिलेले नाहीये तसेच खाजगी समारंभातही पाहिलेले नाहीये.

2012नंतर रि सोल जू या पतीसोबत प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतं. कारखाने, रुग्णालय आणि थीम पार्कपासून ते उत्तर कोरियाच्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्या किम जोंग याच्यासह दिसत. मात्र 28 मार्चनंतर त्यांना कोणीही कोणत्याच सार्वजनिक वा खाजगी कार्यक्रमात पाहिलेले नसल्याने गायब होण्याबाबतच्या अनेक अटकळ बांधल्या जात आहेत.