वाढलेलं वजन आणि दाढी... या सुपरस्टारला ओळखलतं का ?

रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. रणवीर त्याच्या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. सध्या रणवीर त्याच्या बाळाच्या स्वागतासाठी कुंटुबाला वेळ देत आहे. अशातच आता त्याच्या नव्या सिनेमाची चर्चा होत आहे.  

Updated: Jun 16, 2024, 03:33 PM IST
वाढलेलं वजन आणि दाढी... या सुपरस्टारला ओळखलतं का ?  title=

रणवीर लवकरच त्याच्या आगामी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यासंदर्भात लेखिका शोभा डे यांनी रणवीरसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. रणवीरने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. अशातच आता तो नव्या भूमिकेच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी त्याने 15 किलो वजन वाढवलं असल्याची माहिती शोभा डे यांनी इंस्टाग्रामवरुन दिली. 'बाजीराव' ते 'अल्लाउल्दीन खिलजी' या सगळ्या भूमिकांसाठी रणवीरने त्याच्या शरीरावर प्रचंड मेहनत घेतली होती. रणवीर कायमच त्याच्या नव्या भूमिकेसाठी अभिनयासोबत दिसण्यावरही विशेष लक्ष देतो. त्यामुळे आता या आगामी सिनेमातील त्याचा लुक कसा असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shobhaa De (@shobhaade)

सिनेलेखिका शोभा डे यांनी रणवीर सोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रणवीरने केस आणि दाढी वाढवल्याचं दिसून येत आहे. शोभा डे यांनी रणवीरला त्याच्या नव्या आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. अलिबागच्या आवडत्या कॅफेत अनपेक्षितपणे आवडत्या माणसांची भेट झाली. आता लवरकच तू बाबा होणार आहेस त्याचबरोबर तुझा नवा देखील येत आहे. खऱ्या आयुष्यातल्या बाबाच्या आणि सिनेमातील नव्या भुमिकेसाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा... जितक्या मनापासून तू न थकता कॅमेऱ्यासमोर काम करतो, तितकाच खऱ्या आयुष्यात ही तू सगळ्यांशी प्रेमाने वागतोस, आणि म्हणूनच तू माझ्यासाठी खूप खास आहेस. अलिबागच्या या निसर्गरम्य ठिकाणी आवडीची माणसं भेटणं, म्हणजे याहून वेगळा आनंद काय असू शकतो. असं कॅप्शन त्यांनी दिलं.  शोभा डे यांनी रणवीरला सिनेमासाठी आणि त्याच्या नव्या आयुष्यातील जबाबादाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या.  

रणवीर आणि दीपिकाच्या आयुष्यात लवकरच त्यांच्या छोट्या बाळाचं आगमन होणार आहे. त्यासाठी रणवीर काही दिवस कॅमेऱ्यापासून लांब असून तो त्याच्या बाळाच्या स्वागताच्या तयारीत आहे. काही दिवसांनी सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करण्याबाबत रणवीरने निर्मात्यांशी चर्चा केली असल्याचं म्हटलं जातंय. रणवीर सध्या त्याची पत्नी दीपिकासोबत #metime चा आनंद घेतोय. त्याचबरोबर तो येणाऱ्या सिनेमासाठी फिटनेसवर देखील खूप मेहनत घेत आहे. त्याच्या नव्या सिनेमाचं नाव अजूनही गुलदस्त्यात असून लवकरच या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होईलं असं सांगितलं जातंय.