भारताचं कौतूक करत हिलेरी आणि ट्रम्प यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

ट्रम्प यांना रशियासोबत चांगले संबंध हवे आहेत. तर हिलेरी यांचं म्हणणं आहे की, ट्रम्प जिंकले तर ते पुतीनचे बाहुली म्हणून काम करतील. अमेरिकेत ८ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

Updated: Nov 6, 2016, 06:58 PM IST
भारताचं कौतूक करत हिलेरी आणि ट्रम्प यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल title=

वॉशिंग्टन : ट्रम्प यांना रशियासोबत चांगले संबंध हवे आहेत. तर हिलेरी यांचं म्हणणं आहे की, ट्रम्प जिंकले तर ते पुतीनचे बाहुली म्हणून काम करतील. अमेरिकेत ८ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

पाकिस्तानला शिक्षा देईल - ट्रम्प

ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'पाकिस्तान हा एक अस्थिर देश आहे. पाकिस्तानकडे असलेली अणुशक्तीमुळे जग धोक्यात आहे. याचा सामना करण्यासाठी भारत अमेरिकेची मदत करु शकतो. पाकने ९/११ हल्ल्यानंतर अनेकदा विश्वासघात केला आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पाकिस्तानला प्रत्येक चुकीसाठी शिक्षा देईल.'

हिलेरी यांनी देखील शक्यता वर्तवली आहे की, पाकिस्तानात सत्तापालट होऊ शकते. जिहादी सरकारवर कब्जा करु शकतात. दहशतवादी अणू शक्ती मिळवून त्याचा गैरवापर करु शकतात. अणू हल्ल्याचा सामना करावा लागेल.

भारताबाबत हिलेरी यांचं मत

हिलेरी म्हणतात की, राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याप्रमाणे त्याही भारतासोबत संबंध चांगले ठेवतील. येणाऱ्या काळात भारत आशिया खंडातला सर्वात ताकदवर देश म्हणून पुढे येणार आहे. त्यामुळे जगभरात भारताचं महत्त्व अधिक वाढणार आहे.

भारताचे लोकं आणि त्यांचा देश शानदार : ट्रम्प

ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, भारताचे लोकं आणि त्यांचा देश शानदार आहेत. जगातील सर्वात मोठा डेमोक्रेटीक देश आहे. जर मी राष्ट्राध्यक्ष झालो तर भारत-अमेरिका संबंध आणखी चांगले करेल. मी पंतप्रधान मोदींचा प्रशंसक आहे. मोदींनी इकोनॉमिक रिफॉर्म्स आणि ब्यूरोक्रेसीमध्ये बदल घडवत भारताला विकसीत करत आहेत. ते ऊर्जावान व्यक्ती आहेत. माझे खूप सारे भारतीय मित्र आहेत. ते सगळे अप्रतिम आहेत.'