'गैर इस्लाम महिलांवर बलात्कार करणं इस्लामला मान्य'

इस्लाममध्ये इतर धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार म्हणजे काही गुन्हा नव्हे...असं म्हणणं आहे दहशतवादी संघटना 'इसिस'चं.... आपल्या घृणास्पद आणि तितक्याच क्रूर कारवायासाठी नेहमीच धर्माचा आसरा घेणाऱ्या इसिसनं महिलांवर बलात्कार करणं हा इस्लाम धर्माचाच एक भाग असल्याचं म्हटलंय. 

Updated: Aug 14, 2015, 06:46 PM IST
'गैर इस्लाम महिलांवर बलात्कार करणं इस्लामला मान्य' title=

नवी दिल्ली : इस्लाममध्ये इतर धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार म्हणजे काही गुन्हा नव्हे...असं म्हणणं आहे दहशतवादी संघटना 'इसिस'चं.... आपल्या घृणास्पद आणि तितक्याच क्रूर कारवायासाठी नेहमीच धर्माचा आसरा घेणाऱ्या इसिसनं महिलांवर बलात्कार करणं हा इस्लाम धर्माचाच एक भाग असल्याचं म्हटलंय. 

हा खुलासा केलाय या दशतवाद्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या एका १२ वर्षीय यजीदी तरुणीनं... इराकमध्ये या तरुणीनं आपल्यावरचे अत्याचार कथन करताना इसिसच्या धर्माच्या आडून केल्या जाणाऱ्या कृत्याचा पाढाचा वाचून दाखवलाय. आपल्यावर बलात्कार करताना यात आपण काहीही चुकीचं करत नाही, कारण मी इस्लामचं पालन करतोय, तुझ्यावर बलात्कार करून मी खुदाच्या जवळ जातोय, असं तो बलात्कारी तिला सांगत होता. ही मुलगी दहशतवाद्यांच्या कैदेत तब्बल ११ महिने होती.

डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार, धर्मांध आयएसच्या दहशतवाद्यांच्या दाव्यानुसार, कुराणमध्ये आपल्या धर्माशिवाय इतर धर्मांच्या स्त्रियांवर बलात्कार करणं 'योग्यच' असल्याचं म्हटलंय.

इसिसनं गेल्यावर्षी जवळपास ५००० अल्पसंख्यांक मुलींचं अपहरण केलं होतं. त्यातील कित्येकींचा त्यांनी सेक्स गुलाम म्हणून वापर केला तर अनेकींना विकून टाकलं.

इराक आणि सीरियाच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवल्यानंतर इसिसचे दहशतवादी यजीदी आणि अस्सीरियन ख्रिश्नन महिलांना बंधक बनवून त्यांच्यावर बलात्कार करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.