सिंगापूर : एखाद्या कंपनीने आपले उत्पादन वापरू नका हे सांगणे किंवा तशी जाहिरात करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. असा काहीसा प्रकार सिंगापूरमध्ये ड्युरेक्स या कंडोम तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे.
ड्युरेक्सने सिंगापूरमध्ये आपल्या ग्राहकांची माफी मागितली आहे. माफी मागताना त्यांनी म्हटेल की ग्राहकांनी आमचे कंडोम वापरणे बंद करावे. कंपनीने यासाठी एका वर्तमानपत्रात माफीनामा जाहीर केला आहे.
या माफीनाम्यात म्हटले की ५० वर्षामद्ये सिंगापूरची अर्थव्यवस्था वेगाने वाढली आहे. पण त्याच वेळी देशाचा बर्थ रेट खूप कमी झाला आहे. हे आमच्या लक्षात आले की यामुळे आम्ही अडचणीत येऊ शकतो.
ड्युरेक्स कंपनी आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार काम करते. कंडोम वापरणे हे बर्थ रेट (जनन दर) कमी होण्याचे मुख्य कारण असू शकतो हे आम्ही खूपच लवकर सांगतो आहे.
बर्थ रेट कमी करणे असा आमचा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळे आम्ही माफी मागतो. या आत्मपरिक्षणानंतर आम्ही हा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे.
९ ऑगस्ट प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातात ड्युरेक्सने म्हटले आहे की आमचे प्रॉडक्टस वापरू नका. सिंगापूरच्या गोल्डन जुबली वर्षात खूप सेलिब्रेट करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.