कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

भारतातील ‘बचपन बचाओ आंदोलना’चे प्रणेते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता मलाला युसुफजई यांना संयुक्तपणे 2014 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 

Updated: Oct 10, 2014, 07:31 PM IST
कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार title=

स्टॉकहोम : भारतातील ‘बचपन बचाओ आंदोलना’चे प्रणेते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता मलाला युसुफजई यांना संयुक्तपणे 2014 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 

मध्य प्रदेशातल्या विदिशास्थित कैलाश सत्यार्थी नोबेल शांति पुरस्कार मिळवणारे दुसरे भारतीय आहेत. यापूर्वी, मदर टेरेसा यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

‘बचपन बचाओ आंदोलनाद्वारे’ कैलाश सत्यार्थी बाल अधिकारांसाठी संघर्ष करताना दिसलेत. तर मलाला युसुफजई हीदेखली मुलींच्या शिक्षणासाठी झगडतेय... याचसाठी ती तालिबान्यांकडून जीवघेण्या हल्ल्याची शिकारही झाली होती.

पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत, कैलाश सत्यार्थी यांनी नोबेल शांती पुरस्कार मिळाल्यानं आपण खूप खूश असल्याचं म्हटलय. हा पुरस्कार म्हणजे लहान मुलांच्या अधिकारासाठी सुरु असलेल्या आमच्या संघर्षाचा सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलंय.

शुक्रवारी नॉर्वेच्या नोबेल कमेटीच्या चेअरमनने याची घोषणा केली. एकूण 278 सहभागींमध्ये कैलाश सत्यार्थी आणि मलालाल युसूफजई विजेते ठरलेत. कमिटीच्या म्हणण्यानुसार, यावर्षी जास्तीत जास्त लोकांनी या पुरस्कारासाठी नामांकनपत्र दाखल केलं होतं. 2013 या वर्षी एकूण 259 लोकांनी नामांकनपत्र दाखल केलं होतं. 

नोबेल शांती पुरस्काराची घोषणा करणाऱ्या कमिटीनं कैलाश सत्यार्थी यांचं कौतुक करत त्यांनी महात्मा गांधींची परंपरा पुढे नेत मुलांच्या अधिकारांसाठी संघर्ष केल्याचं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.