संयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश

संयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश मिळालंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारावरील चर्चा एक वर्षापर्यंत वाढवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय.

Updated: Sep 15, 2015, 11:42 AM IST

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्रसंघात भारताला मोठं यश मिळालंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारावरील चर्चा एक वर्षापर्यंत वाढवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय.

या निर्णयामुळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या दृष्टीनं भारतानं एक पाऊल पुढे टाकलंय. संयुक्त राष्ट्रसंघाचे 200 सदस्य सुरक्षा परिषदेत सुधारणेच्या मागणीसाठी एक वर्ष चर्चा करण्यासाठी राजी झालेत.

चर्चेनंतर स्थायी सदस्य देशांची संख्या वाढवण्याबाबत सहमती झाल्यास सध्या असलेल्या 5 स्थायी देशांसोबत आणखी नवे देश जोडले जाण्याची शक्यता आहे.. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा प्रस्ताव संमत होणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठा विजय आहे.

आपल्या परदेश दौ-यात मोदी सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्वाचा मुद्दा उचलत आलेत. सध्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रांस हे कायमस्वरुपी सदस्य आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.