कुत्र्यांनी केला वृद्धावर हल्ला, तो़डले लचके केलं अर्धमेला

 अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिलेशी झालेल्या वादानंतर एका वृद्धावर दोन पिटबुल डॉग्ज सोडण्यात आले. त्यांनी ६२ वर्षीय फ्रान्सिस्को वोव हे गंभीर जखमी झाले आहे. 

Updated: Sep 14, 2015, 01:34 PM IST
कुत्र्यांनी केला वृद्धावर हल्ला, तो़डले लचके केलं अर्धमेला title=

न्यू यॉर्क  :  अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिलेशी झालेल्या वादानंतर एका वृद्धावर दोन पिटबुल डॉग्ज सोडण्यात आले. त्यांनी ६२ वर्षीय फ्रान्सिस्को वोव हे गंभीर जखमी झाले आहे. 

वोव हे बेलमॉन्ट एव्हेन्यू चर्चजवळ फिरत असताना ओलिव्हर नावाच्या महिलेने आपले दोन बुलडॉग्जचे पट्टे सोडले आणि त्यांना वोव यांच्यावर हल्ला करण्यास सांगितले. कुत्र्यांनी केवळ चावले नाही तर वोव यांचे लचके तोडले. रक्तबंबाळ केले. या घटनेचा व्हिडिओ समोरच्या एका अपार्टमेटच्या महिलेने शूट केला. 

या प्रकरणी कुत्र्यांच्या मालकीणीला अटक करण्यात आली आहे. 

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ.. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.