www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मूळचे भारतीय वंशाचे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या नेतृत्वविकास आणि समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असलेल्या राकेश खुराणा यांची हार्वर्डच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आलीय. यंदा १ जुलैला राकेश खुराणा अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीची स्थापना इसवी सन १६३६मध्ये झाली. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं राज्यही आलं नव्हतं... तर देशात शहाजहानचं राज्य होतं... ब्रिटीश वसाहतवाद्यांनी यावेळी अमेरिकेत हातपाय पसरायला सुरुवात केली होती... अशाप्रकारे जवळपास ४०० वर्षांपूर्वी या सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक युनिव्हर्सिटीची स्थापना झाली... प्रा. राकेश खुराणा हे अशाप्रकारे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सर्वोच्यपदी पोहोचलेले भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती आहेत.
हार्वर्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाईड सायन्सचे प्रमुख व्यंकी नारायणमूर्ती तसंच नितीन नोहरिया यांनी हार्वर्डच्या सर्वोच्यपदाचा मान मिळवलाय. हार्वर्डला अनेकांनी भरघोस देणग्या देऊन अतिशय श्रीमंत युनिव्हर्सिटी बनवलं.
युनिव्हर्सिटीचा आर्थिक पसारा जवळपास ३२ मिलियन डॉलर एवढा आहे. भारतातली एकही युनिव्हर्सिटी एवढ्या आर्थिक सामर्थ्याच्या जवळपासही नाही. प्राध्यापक राकेश खुराणांच्या या निवडीबाबत त्याचं सर्वच स्तरातून स्वागत होतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.