नवी दिल्ली : उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका कार्यक्रमात लागलेल्या बॅनरमध्ये चक्क भारताचा चुकीचा नकाशा छापण्यात आलेला दिसला.
या नकाशात पाकिस्तानला भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आलं. उपराष्ट्रपती सध्या मोरक्कोमध्ये आहेत. मोरक्कोची राजधानी रबातच्या एका युनिव्हर्सिटीत अन्सारी यांचं भाषण होणार आहे.
Rabat: Indian officials have intervened. The 'expanded' Indian map with Pakistan in it has white tape over it now pic.twitter.com/tV6IJECFGI
— ANI (@ANI_news) June 1, 2016
मोहम्मद व्ही युनिव्हर्सिटीच्या बाहेर या कार्यक्रमाचे बॅनर लागलेले आहेत. या बॅनरवर एका बाजुला मोरक्को तर दुसऱ्या बाजुला भारताचा नकाशा लावलेला आहे. परंतु, या भारताच्या नकासात पाकिस्तानही दाखवण्यात आलाय.
ही चूक लक्षात आल्यानंतर आयोजकांनी तत्काळ ती सुधारण्यासाठी नकाशावर टेप लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अयशस्वी ठरला.
भारत आणि मोरक्कोनं 'भारत-मोरक्को चेम्बर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इन्डस्ट्रीज' (आयएमसीसीआय) स्थापन केलंय. यामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.