पावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार

 जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेली बुर्ज खलिफा दुबईत ताठ मानेने उभी आहे. ८०० मीटर उंचीची ही जगातील सर्वात मोठी इमारत असून या पेक्षा अधिक उंच स्ट्रक्चर बांधण्याचा विचार सध्या दुबईत सुरू आहे. दुबईत पाऊस वाढविण्यासाठी कृत्रिम डोंगर तयार करण्याचा विचार सुरू आहे. 

Updated: May 31, 2016, 09:43 PM IST
 पावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार title=

दुबई :  जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेली बुर्ज खलिफा दुबईत ताठ मानेने उभी आहे. ८०० मीटर उंचीची ही जगातील सर्वात मोठी इमारत असून या पेक्षा अधिक उंच स्ट्रक्चर बांधण्याचा विचार सध्या दुबईत सुरू आहे. दुबईत पाऊस वाढविण्यासाठी कृत्रिम डोंगर तयार करण्याचा विचार सुरू आहे. 

बेसीक आयडीया...

यूएई आणि अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉसफेरिक रिसर्च (एनसीएआर) यांनी ही आयडीया काढली आहे.  आपल्याला लहानपणी शिकविल्याप्रमाणे पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात आणि ते ढग डोंगराने अडविल्यावर त्याचे पावसात रुपांतर होते आणि पाऊस पडतो. ही बेसीक आयडीया या ठिकाणी राबविण्याचा विचार सुरू आहे. 

रिसर्च सुरू.....

या संदर्भात एक रिसर्च केला जात असून त्यांची डिटेल मॉड्युलिंग आणि रिपोर्ट या वर्षाच्या अखेरीस यूएईला सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर कशाप्रकारे डोंगर तयार करण्यात येईल यावर संशोधन केले जात आहे. 

यूएई हे जगातील सर्वात सुका देश आहे. वर्षाला फक्त १०० मिमी पाऊस या ठिकाणी पडतो. या ठिकाणी कृत्रिम पाउसाचाही प्रकार करण्यात आला. पण आणखी नैसर्गिक रित्या पाऊस पाडण्यासंबंधी त्याचे काम सुरू आहे. 

किती येणार खर्च...

यापूर्वी हॉलंडला २००० मीटरचा कृत्रिम डोंगर बांधण्यासाठी २०० बिलियन पाउंड इतका खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी यूएईने कृत्रिम बेट आणि कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या श्रीमंत देशाकडे खूप पैसा आहे. त्यामुळे पाऊस वाढविण्यासाठी ते आगामी काळात कृत्रिम डोंगर उभारू शकतात. 

आपल्याकडे लाज वाटली पाहिजे

आपल्याकडे डोंगर आणि निसर्ग संपदा मोठ्या प्रमाणात आहे. पण बांधकामांसाठी आपण हेच डोंगर पोखरत आहोत आणि तेथे वाळवंट करण्याचा प्रवास सुरू करत आहोत. पण दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशात डोंगर उभारून पाऊस पाडण्याचा विचार सुरू आहे. या बद्दल भारतीयांना लाज वाटली पाहिजे.