जगातील सर्वात फास्ट ट्रेन बनणार हायपरलूप वन, अमेरिकेत पहिली चाचणी यशस्वी - पाहा व्हिडिओ

 हायपरलूप वन या जगातील सर्वात फास्ट ट्रेनचं बुधवारी अमेरिकेच्या नॉर्थ लास वेगास येथे यशस्वी परीक्षण करण्यात आले. हायपरलूप वनचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ही बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगाने जाते. जगातील सर्वात फास्ट ट्रेनचा ताज हिच्या डोक्यावर जातो आहे. 

Updated: May 13, 2016, 04:01 PM IST
 जगातील सर्वात फास्ट ट्रेन बनणार हायपरलूप वन, अमेरिकेत पहिली चाचणी यशस्वी - पाहा व्हिडिओ title=

नवी दिल्ली :  हायपरलूप वन या जगातील सर्वात फास्ट ट्रेनचं बुधवारी अमेरिकेच्या नॉर्थ लास वेगास येथे यशस्वी परीक्षण करण्यात आले. हायपरलूप वनचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ही बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगाने जाते. जगातील सर्वात फास्ट ट्रेनचा ताज हिच्या डोक्यावर जातो आहे. 

कुठे झाले परीक्षण 

हायपरलूप वनच्या प्रोटोटाइमचे बुधवारी अमेरिकेच्या नेवाडा वाळवंटात यशस्वी परीक्षण करण्यात आले. या परीक्षणात हायपरलूप बनने ३०० मील/ताशी प्रति किलोमीटरने धावली. हे परीक्षण नॉर्थ लॉस वेगासच्या नेवाडामध्ये तयार करण्यात आले. चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर यात केला आहे. यासाठी दोन मैलाचा ट्रॅक तयार करण्यात आला. 

यापेक्षा फास्ट धावणार ट्रेन...

ही ट्रेन तयार करणाऱ्या संशोधकांचा दावा आहे की आगामी काळात एका  व्हॅक्युम ट्यूब (विना हवा) मधून जाणारी कॅप्सुरूल सारखी हायपरलूप ७५० मैल (१२२४ किलोमीटर) ताशी किलोमीटर वेगाना धावू शकते. 

लक्ष्य काय आहे...

या ट्रेनला ध्वनीच्या वेगाने म्हणजे ताशी १२३६ किलोमीटरने पळविण्याचे या संशोधकांचे लक्ष्य आहे. 

व्हॅक्युम ट्यूब कशी काम करणार 

एखाद्या ट्यूबमध्ये हवा असेल तर त्यातून जाणारी वस्तू कमी वेगाने जाईल पण त्यातून हवा काढली तर त्याला अडथळा निर्माण होणार नाही. मग ती दुप्पट वेगाने पुढे सरकते. 

कधी येणार ही ट्रेन रुळावर 

ही ट्रेन २०१८ पर्यंत रुळावर येण्याच शक्यता आहे. तर २०२०मध्ये ही ट्रेन जगाचे परिवहनाचा चेहरा बदलण्याची शक्यता आहे. 

पाहा या परीक्षणाचा व्हिडिओ 

 

कशी काम करले ट्रेन पाहा ग्राफीक्स