नवी दिल्ली : काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम शेजारील देश पाकिस्तानवर देखील दिसू लागला आहे. पाकिस्तानात आता मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे.
पाकिस्तान पिपल्स पक्षाचे उस्मान सैफुल्ला खान यांनी संसदेत १००० आणि ५००० च्या नोटा बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बनावट नोटा रद्द व्हाव्यात आणि अधिक प्रमाणात बँकीग सुविधांचा वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत ठेवण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या नेत्यांनी भारतात जेव्हा काळ्या पैशांच्या बाबतीत कठोर पाऊल उचललं गेलं त्यानंतर हा मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी रात्री हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्यानंतर जगभरात त्याची दखल घेतली गेली होती.