...तर भारत अमेरिकेचा चांगला मित्र बनेल - ट्रम्प

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास मोदींची धोरणं लागू करणार असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. 

Updated: Oct 16, 2016, 10:54 AM IST
...तर भारत अमेरिकेचा चांगला मित्र बनेल - ट्रम्प title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास मोदींची धोरणं लागू करणार असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॅन असल्याचंही ट्रम्प म्हणालेत.. अमेरिकेतल्या भारतीयांशी संवाद साधताना प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केलंय.  

दहशतवाद संपवण्याच्या भारताच्या भूमिकेला कायम पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबई हे आवडतं शहर असल्याचंही ट्रम्प म्हणालेत. राष्ट्राध्यक्ष बनलो तर भारत अमेरिकेचा चांगला मित्र बनेल आणि हिंदूचा आपण कायम सन्मान करतो असंही त्यांनी म्हटलंय.