नवी दिल्ली : न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशात पुन्हा एकदा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न झाला.
किशोरगंजमध्ये ईदच्या नमाज पठणादरम्यान हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची बातमी समजतेय तर जवळपास ११ जण जखमी झालेत.
ईदच्या नमाज पठणासाठी लोक जमत असतानाच आयोजन स्थळाच्या प्रवेशद्वारावर एक स्फोट झाला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरही मारला गेलाय. हल्लेखोरांनी पोलिसांवर चाकू आणि स्फोटकांसहीत हल्ला केला.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत धिक्कार केलाय. ईदच्या दिवशी घडवून आणला गेलेला घातपात हा इस्लाम आणि मानवतेच्या विरुद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय.
बांग्लादेशच्या मदतीसाठी भारतानं राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाची (एनएसजी) एक टीम पाठवण्याचा निर्णय घेतलाय.