‘इसिस’नं आणखी एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटलं

जेम्स फॉली या अमेरिकन पत्रकाराच्या शिरच्छेद करून त्याचा व्हिडिओ जाहीर करणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं आता अमेरिकेच्या आणखी एका पत्रकाराचा शिरच्छेद केलाय.

Updated: Sep 3, 2014, 08:51 AM IST
‘इसिस’नं आणखी एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटलं  title=

वॉशिंग्टन : जेम्स फॉली या अमेरिकन पत्रकाराच्या शिरच्छेद करून त्याचा व्हिडिओ जाहीर करणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं आता अमेरिकेच्या आणखी एका पत्रकाराचा शिरच्छेद केलाय.

स्टीवन सोटलोक याचं मुंडकं धडावेगळं करताना चित्रीत केलेला व्हिडिओ सीरिया आणि इराकच्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS)नं मंगळवारी सोशल मीडियावर जगजाहीर केलाय. 

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या गुप्तचर संघटना या व्हिडिओच्या वास्तविकतेची पडताळणी करत आहेत. 

या व्हिडिओचं शीर्षक आहे, ‘अमेरिकेला दुसरा संदेश’... यामध्ये सेटलॉफ याचा शिरच्छेद चित्रीत करण्यात आलाय. यावेळी, ‘इराकमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाची किंमत मी चुकवतोय’ असं म्हणताना सेटलॉफ दिसतोय. तसंच ब्रिटनचा बंदी असलेल्या डेव्हिड हेन्स याच्य जिवाला धोका असल्याचंही यामध्ये सांगण्यात आलंय.  

ही बातमी व्हाईट हाऊसच्या दररोजच्या प्रवक्ता संमेलनादरम्यान फॅली व्हाईटनं दिलीय. ‘मी आज या बातम्या पाहिल्या नाहीत. मला वाटतं की मी जेव्हा इथं आलो तेव्हा काही मिनिटांतच हे सगळं सुरू झालं’ तसंच यावेळी फॅलीनं ‘अमेरिकेनं सोटलॉफला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न तसंच साधनं लावल्याचं’ही सांगितलं. 

‘मी सध्या या व्हिडिओच्या किंवा या बातमीच्या वास्तविकतेची पृष्टी करण्याच्या स्थिती नाही’ असं यावेळी अधिकाऱ्यानं म्हटलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.