वॉशिंग्टन: जिवंत साप घातक असतो हे तर आपल्या सर्वांनाच माहितीय, मात्र मेलेला साप सुद्धा खूप घातक असतो. सापांमध्ये मेल्यानंतर अनेक तास चेतना असते. अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ अरकांसासचे प्राध्यापक स्टीवन बीऑपरनं सांगितलं, 'साप मेल्यानंतरही त्याच्या शरीरात असलेलं आयन सक्रीय असतं, जे की सापांच्या चेतापेशींमध्ये असतं.
'जेव्हा मेल्यानंतर लगेच सापासोबच छेडछा़ड केली जाते, तेव्हा चेतापेशी सक्रीय होतात आणि त्याच्या आयनमध्ये गती येते. ही गती स्नायूंमध्ये गती उत्पन्न करते आणि चावणे आणि डसण्यासारखी क्रियेला प्रेरित करते. बीऑपरनं सांगितलं की, कोब्रा आणि रॅटलस्नेक सारख्या विषारी सापांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक तास चावणे किंवा डसण्याची चेतना मेंदूत सक्रीय असते.
लाईव्ह सायंस मासिकात छापून आलेल्या लेखानुसार बीऑपरनं सांगितलं की, सामान्य स्थितीत सापांमध्ये मृत्यूनंतर काही तास चेतना बाकी असते. हा गूण थंड रक्त असलेल्या अनेक जंतूमध्येही दिसून येतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.