मक्कामधील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ७१७ वर

 मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ४०० जण जखमी झाले आहे. रॉयटर्सने साऊदी अधिकाऱ्यांचा हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार शैतानाला दगड मारण्याचा परंपरेवेळी ही चेंगराचेंगरी झाली. 

Updated: Sep 24, 2015, 07:43 PM IST
मक्कामधील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ७१७ वर title=
सौजन्य - Saudi Gazette

मक्का :  सौदी अरेबियातील मक्कामध्ये गुरूवारी हज यात्रेदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ७१७ वर पोहोचला आहे. ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

हज यात्रेचा आजच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारण्याची प्रथासाठी लाखोंचा जनसमुदाय या परिसरात जमा झाला होता. यावेळी चेंगरचेंगरी झाल्याचे सौदी अरेबियाच्या वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

मुस्लिम धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेसाठी सुमारे २० लाखांहून अधिक भाविक मक्का येथील मशिदीत उपस्थित होते. 

भारतातून दीड लाख मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी सौदीमध्ये गेले आहेत. मात्र, चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये भारतीयांच्या समावेशाबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

साऊदी अरबमध्ये गुरूवारी ईद होती. यामुळे मक्काच्या मुख्य मशीदीत खूप गर्दी झाली होती. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी हज यात्रींची संख्या वाढल्याने मक्काच्या मुख्य मशीदीत उभे राहण्याची जागा वाढविण्यात येत आहे. साऊदी चॅनलने दिलेल्या बातमीनुसार या ठिकाणी २० लाख जण उपस्थित होते. दुर्घटनेची अधिक माहीती अजून येणे बाकी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.