चीनमध्ये माणसं पिंजऱ्यात वाघ-सिंह मोकळे

चीनमध्ये एक प्राणी संग्रहालय असे आहे की त्या ठिकाणी प्राणी मुक्त संचार करतात आणि माणसं पिंजऱ्यात असतात. 

Updated: Sep 24, 2015, 11:29 AM IST
चीनमध्ये माणसं पिंजऱ्यात वाघ-सिंह मोकळे  title=
सौजन्य - my fascinating.com

बीजिंग : चीनमध्ये एक प्राणी संग्रहालय असे आहे की त्या ठिकाणी प्राणी मुक्त संचार करतात आणि माणसं पिंजऱ्यात असतात. 

हो, हे खरं आहे. चीनच्या कनजीम शहरातील लेह लेडू वन्यजीव केंद्रात हा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे.  प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवण्यापेक्षा त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या माणसांना पिंजऱ्यात ठेवण्याची अभिनव कल्पना येथील प्राणीसंग्रहालय प्रशासना सुचली. 

वाघ, सिंह, हत्ती यांना खुले सोडले आहे आणि त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना एका पिंजऱ्याच्या गाडीतून फिरविण्यात येते. ही गाडी त्यांना प्राणी संग्रहालयाच्या विविध भागात घेऊन जाते. 

पाहा हा व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.