आयएसआयएसमध्ये 13 वर्षाँचा दहशतवादी

इराक आणि सिरियामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरवणाऱ्या आयएसआयएस अतिरेकी संघटनेने एका १३ वर्षांच्या मुलाचा आपल्या संघटनेत समावेश केला आहे. 

Updated: Aug 23, 2014, 09:21 PM IST
आयएसआयएसमध्ये 13 वर्षाँचा दहशतवादी title=

नवी दिल्‍ली : इराक आणि सिरियामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरवणाऱ्या आयएसआयएस अतिरेकी संघटनेने एका १३ वर्षांच्या मुलाचा आपल्या संघटनेत समावेश केला आहे. 

ज्या वयात मुलाच्या हातात पुस्तकं हवीत त्या वयात हा मुलगा बंदुक घेऊन काहीही दोष नसलेल्या लोकांचा जीव घेण्यासाठी तयार होतोय.

बेल्जियमचा रहिवासी असणारा हा यूनुस अबाऊंद जानेवारी महिन्यात त्याचा भाऊ अब्‍दुल हामिद सोबत सिरियात आला होता.

लंडनमधल्या किंग्‍स महाविद्यालयातील विशेषज्ञाच्या मते यूनुसचे पिता उमर हे एक दुकानदार असून मोरक्‍कोचे राहणारे आहेत.

दहशतवाद्यांनी अगोदर अब्दुल याला जिहादसाठी भडकवलं आणि मग त्याला संघटनेत घेतलं. त्यानंतर तो यूनुसलाही सिरियात घेवून आला. सध्या यूनुस या संघटनेत काय काम करतो हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

विशेषज्ज्ञाच्या मते आयएसआयएस आपल्या संघटनेचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकन पत्रकाराची हत्‍या हे सुद्धा याचाच एक भाग आहे. या संघटनेकडे तंत्रज्ञानाची ही चांगली माहिती असल्याने या माध्यमामार्फत प्रचार करायचा आहे. या संघटनेला आपल्या संघटनेत चांगलं इंग्रजी बोलणाऱ्य़ा लोकांची गरज आहे कारण त्यांना अमेरीकन माध्यमांमध्ये आपला प्रचार करायचा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.