गाझामध्ये इस्राईलचा हवाई हल्ला, 5 ठार

संघर्ष विराम करार फिस्कटल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षाच्या 47व्या दिवशी शनिवारी गाजावर इस्राईलने हवाई केला. या हल्यात पाच पॅलेस्टाईन लोक मारले गेले. 

Updated: Aug 23, 2014, 09:18 PM IST
गाझामध्ये इस्राईलचा हवाई हल्ला, 5 ठार  title=

गाझा : संघर्ष विराम करार फिस्कटल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षाच्या 47व्या दिवशी शनिवारी गाजावर इस्राईलने हवाई केला. या हल्यात पाच पॅलेस्टाईन लोक मारले गेले. 
हमासकडून जोपर्यंत सफेद झेंडे दाखवून शांतीचं आव्हान होत नाही तो पर्यंत हवाई हल्ले सुरूच राहतील. सरकारला हमासला वठणीवर आणण्यासाठी नियोजनात्मक लक्ष्य केंद्रीत केले आहे, अशी माहिती  इस्राईलचे विदेश मंत्री यांनी दिली.

मंगळवारी या दोघांमधील वाद संपवण्यासाठी चर्चा झाली, पण ही चर्चा निष्फळ ठरल्याने गाझावर हल्ले सुरू झालेत. मध्य गाझामध्ये आज सकाळी एका घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच सदस्य मारले गेले.

गाझाचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ अल कद्रने म्हटले, 'गेल्या मंगळवारी हा संघर्ष संपण्यासाठी जी चर्चा निष्फळ ठरली त्यानंतर इस्राईलकडून हल्ले सूरूच आहेत. इस्राईलवर रॉकेट हल्ले केले गेले.

गाझाच्या वैद्यकीय सेवा अधिकाऱ्य़ाने सांगितले, या वर्षी जुलै महिण्याच्या सुरुवातीपासून चालेल्या या संघर्षात आतापर्यंत 2,098 पॅलेस्टाईन मारले गेले आहेत. 10,550 लोक जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच म्हणण आहे की, मारले गेलेले पॅलेस्टाईनमध्ये 70 टक्के सामान्य नागरिक आहेत. यासपूर्णं संघर्षात 67 इस्राईली मारले गेले ज्यात बहुतांश सैनिक आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.