श्रीमंत सेलिब्रेटीत अँजेलिना जोली पहिली

फोर्ब्ज या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत जगातील शंभर श्रीमंत सेलिब्रेटींमध्ये पहिल्या क्रमांकावर हॉलिवूडमधील जगप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीचे नाव आहे.

Updated: Apr 5, 2012, 10:43 PM IST

www.24taas.com,लंडन 

 

 

फोर्ब्ज या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत जगातील शंभर श्रीमंत सेलिब्रेटींमध्ये पहिल्या क्रमांकावर हॉलिवूडमधील जगप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीचे नाव आहे.

 

 

 

अँजेलिनाची मादक अदा सर्वांना घायाळ करीत असते. आता तर ती जगातील पहिल्या क्रमांकाची सेलिब्रेटी झाल्याने ती कौतुकाचा विषय झाली आहे. मागील वर्षी आपल्या जुळ्या मुलांचे छायाचित्र एका मासिकाला विकून अँजेलिनाने कमविलेल्या एक कोटी 40 लाख डॉलरचा समावेश तिच्या उत्पन्नात करण्यात आला आहे. या यादीत अँजेलिनाचा पती ब्रॅड पिट हा नवव्या क्रमांकावर आहे. तो आपली पहिली पत्नी जेनिफर एनिस्टन हिच्या मागे आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर पॉप दिवा मडोना आहे.

 

 
सर्वांत जास्त उत्पन्न असलेल्या तसेच माध्यमांमध्ये सर्वाधिक प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या माहितीच्या आधारे फोर्ब्जने ही यादी बनविली आहे. या यादीत पहिला क्रमांक गाठत अँजेलिनाने प्रसिद्ध टीव्ही स्टार ओप्रा विनफ्रे हिला मागे टाकले आहे. यापूर्वी दोन वर्षे ओप्रा पहिल्या क्रमांकावर होती. आता ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओप्राने मागील १२ महिन्यात २७५ डॉलर अब्ज इतके उत्पन्न मिळविले होते. तर, अँजेलिनाचे मागील वर्षाचे उत्पन्न दोन कोटी ७० लाख डॉलर इतके होते.