सलमानने गुपचूप कटरिनाशी लग्न केलं!!

व्हा आमच्यापर्यंत ही बातमी आली तेव्हा आम्हांला ही आश्चर्यांचा धक्का बसला... हो.. आश्चर्याचाच धक्का, कारण की बातमी देखील तशीच आहे. बॉलिवूडमधील खानपैकी आतापर्यंत लग्न न झालेला खान म्हणजे सलमान खान.

Updated: Apr 1, 2012, 10:00 PM IST

www.24taas.com

 

जेव्हा आमच्यापर्यंत ही बातमी आली तेव्हा आम्हांला ही आश्चर्यांचा धक्का बसला... हो.. आश्चर्याचाच धक्का, कारण की बातमी देखील तशीच आहे. बॉलिवूडमधील  खानपैकी आतापर्यंत लग्न न झालेला खान म्हणजे सलमान खान... पण सलमानने त्याच्या आवडत्या व्यक्तीशी गुपचूपपणे विवाह आटोपला आहे.

 

त्यामुळे बॉलिवूडमध्ये या चर्चेला ऊत आला आहे. अहो त्याच्या आवडत्या व्यक्तीशी म्हणजे... कटरिना कैफशी लग्न  केलं आहे. आपल्या काही निवडक मंडळींनाच त्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच हा विवाह सोहळा अत्यंत गुप्तपणे उरकण्यात आला आहे.

 

डर्टी पिक्चर आता मराठीमध्ये येतो आहे. महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. डर्टी पिक्चरच्या मराठी रिमेकमध्ये सिक्ल स्मिथाची प्रमुख भूमिका साकारण्यासाठी अनेक अभिनेत्रींच्या नावाची चर्चा आहे यात विद्याचं नावंही टॉप लिस्टवर तर आहेच सोबत चर्चा आहे ती तेजस्विनी पंडितच्या नावाची. या दोघींपैकी कुठली सिल्क प्रेक्षकांना entertainment चा चस्का लावणार? हे लवकरच समजेल.

 

शाहरुख आणि सलमान खानमधलं स्टारवॉर सपलं आहे. इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षे एकत्र राहून हे दोघे कधी एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते. मात्र जे कधीही झालं नव्हतं ते आत्ता होतंय कारण या दोघांमध्ये पॅचअप झालं आहे. शाहरुख सलमान खानसह सिनेमा करतो आहे. त्यामुळे बॉलिवूडचा डॉन आणि दबंग यांना एकत्र पाहण्यासाठी सज्ज व्हा...

 

मिंत्रानो आपली थोडीशी गम्मत करण्याचं आम्हीही ठरवलं कारण की, आज  आहे 'एप्रिल  फुल' सो हॅप्पी 'एप्रिल फुल'....

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags: