<b><font color=red> भारताचा दणदणीत विजय</font></b>

टीम इंडियाने पुन्हा एकदा साडेतिनशे पार टार्गेट सहजगत्या पार करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सीरिजमध्ये 2-2ने बरोबरी साधली...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 31, 2013, 04:15 PM IST

www.24taa.com, झी मीडिया, नागपूर
टीम इंडियाने पुन्हा एकदा साडेतिनशे पार टार्गेट सहजगत्या पार करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सीरिजमध्ये 2-2ने बरोबरी साधली... ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या मोबदल्यात भारतासमोर ठेवलेल्या 351 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना... टीम इंडियाने विराट कोहली आणि शिखर धवनच्या धडाकेबाज सेंच्युरीजच्या जोरावर... 6 विकेट्स आणि 3 बॉल्स राखून दणदणीत विजयाची नोंद केली... पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॉलिंगची पिसं काढल्यानंतर... यंगिस्तानने कांगारूंनाही सारखीच वागणूक दिली... शिखर धवनने 11 फोरच्या मदतीने वन-डे करिअरमधील चौथी सेंच्युरी पूर्ण केली... तर विराट कोहलीने अवघ्या 66 बॉल्समध्ये 18 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने मॅचविनिंह नॉट आऊट 115 रन्स चोपून काढल्या...