येळ्ळूरमधील घटना गंभीर - सर्वोच्च न्यायालय

येळ्ळूरमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांनी केलेला लाठीमार ही गंभीर घटना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे पोलिसांना चांगलीच चपराक  बसलेय.

Updated: Aug 1, 2014, 01:45 PM IST
येळ्ळूरमधील घटना गंभीर -  सर्वोच्च न्यायालय title=

 नवी दिल्ली : येळ्ळूरमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांनी केलेला लाठीमार ही गंभीर घटना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे पोलिसांना चांगलीच चपराक  बसलेय.

या मारहाणीबाबात महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारपर्यंत नवीन याचिका दाखल करावी व त्यासोबत मारहाणी संदर्भातील पुरावेही कोर्टासमोर सादर करावे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयने दिलेत.

कर्नाटक पोलिसांना मराठी बांधवांवर लाठीमार भोवण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांचे गाव महाराष्ट्रात सामील करावे यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात २००४ साली याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. 

या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर येळ्ळूरमधील कर्नाटक पोलिसांच्या लाठीचार्जचे पुरावे सादर केले. सर्वोच्च न्यायालयनेही याची दखल घेत समितीच्या नेत्यांना कलम ३५ अंतर्गत नविन याचिका दाखल करण्यास सांगितले. 

महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारला त्यांची बाजू मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.