अवघं जगच महामंदीच्या उंबरठ्यावर - रघुराम राजन

अवघं जग महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलाय.  १९३० मधील महामंदीची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 

Updated: Jun 27, 2015, 10:23 AM IST
अवघं जगच महामंदीच्या उंबरठ्यावर - रघुराम राजन title=

मुंबई : अवघं जग महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलाय.  १९३० मधील महामंदीची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 

जागतिक महामंदीकडे वाटचाल करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थांना यातून मार्ग काढावाच लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येत नवीन वैश्विक नियमावली तयार करावी लागेल. 'लंडन स्कूल ऑफ बिझनेस'च्या परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. 

मंदीचा फटका सर्वच देशांना बसणार असल्याचं मत रघुराम राजन यांनी नोंदवलंय. दरम्यान, भारतात गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात व्याजदरांमध्य़े घट करण्याचा विचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

विकसित देशांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ही परिस्थिती ओढवली असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.