आईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Updated: Jun 27, 2015, 09:07 AM IST
आईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...  title=

मालडा : पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

मालदा जिल्ह्यातील गोपालपूर गावात राहणाऱ्या ४२ वर्षीय प्रमिला मंडल या महिलेने हे कृत्य केलंय. तिचा दीर डबलू मंडलने प्रमिलाला मुलीचं मांस खाताना बघितलं होतं.

'प्रमिलाचं घर डबलूच्या घरासमोरच आहे. जेव्हा डबलूनं प्रमिलाच्या घरात डोकावलं तेव्हा त्याला आपल्या पुतणीचा रडण्याचा आवाज आला. ४ वर्षीय भारती वेदनेनं किंचाळत होती... आणि तिची आई तिला आपल्या मांडीवर घेऊन तिच्या डोक्याचा भाग कापून खात होती. भारती रक्तबंबाळ झाली होती. 

हे दृश्य पाहून डबलूच्या अंगावर काटाच आला. थोडावेळ तो स्तब्धच झाला.... आणि त्यानं बोंब ठोकली, असं डबलूची पत्नी फाल्गुनी हिनं म्हटलंय. त्यानंतर, फाल्गुनी आणि डबलूनं प्रसंगावधान राखत भारतीला तिच्या आईच्या हातून हिसकावून घेतलं.... आणि तात्काळ हॉस्पीटलमध्ये हलवलं. 

http://www.hindustantimes.com/Images/popup/2015/6/kolkata-pics1.jpg
मुलीची आई 

गावात बातमी कळताच गावकऱ्यांनी प्रमिलाच्या घरी धाव घेऊन तिला बांधून मारहाण केली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाच मुलांची आई असलेली प्रमिला ही ड्र्ग्ज घेते. तसंच ती बुधवारी सकाळपासूनच दारुच्या अंमलाखाली होती. पाच महिन्यांपूर्वीही प्रमिलानं आपली दुसरी मुलगी पार्वती हिला आगीत फेकून दिलं होतं. तेव्हापासून पार्वती ही तिच्या काकाकडेच जास्त वेळ असते.

दरम्यान, पोलिसांनी प्रमिलाला ताब्यात घेतलं... आणि तिची रवानगी हॉस्पीटलमध्ये करण्यात आलीय. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रमिलावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. ती मानसिक रुग्ण ठरू शकते. तिला खऱ्या जगाची ओळखच राहिलेली नाहीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.