नशेचे इंजेक्शन देऊन लैंगिक शोषण करत होता माझा सासरा

 लखनऊमध्ये एका महिलेने सेल्स टॅक्स विभागात कमिश्नर पदावर असणाऱ्या आपल्या सासऱ्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले आहेत. बंधक बनवून सासरा लैंगिक शोषण करीत होता अशी तक्रार पीडित महिलेने लखनऊ पोलिसांमध्ये दिली आहे. 

Updated: Jan 21, 2015, 06:46 PM IST
नशेचे इंजेक्शन देऊन लैंगिक शोषण करत होता माझा सासरा title=

लखनऊ :  लखनऊमध्ये एका महिलेने सेल्स टॅक्स विभागात कमिश्नर पदावर असणाऱ्या आपल्या सासऱ्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले आहेत. बंधक बनवून सासरा लैंगिक शोषण करीत होता अशी तक्रार पीडित महिलेने लखनऊ पोलिसांमध्ये दिली आहे. 

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेतले असून पोलिस या प्रकरणात तपास सुरू केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा सासरा शंकर सरन त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून तिला बंधक बनवून तिचा लैंगिक शोषण करत होता. सासऱ्याने नशेचे इंजेक्शन देण्याचा आरोपही लावण्यात आला. या किळसवाण्या प्रकारात महिलेचा पती आणि तिच्या नणंदेचीही साथ असल्याचा आरोप लावण्यात आला. पीडित महिलेचा पती सौरभ याने आपल्या वडिलांना विरोध केला नाही. 

माझा रोज छळ व्हायचा मला मारहाण व्हायची आणि हातांच्या नसा कापत होते. 

आरोपी सेल्स टॅक्स विभागात जॉइंट कमिशनर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.