इनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख मिस झाली का ? तर काय कराल.

तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न जर अजून भरला नसेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढवली होती पण तरीही अजून तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरली नसेल तरी तुम्हाला ई-फाइलिंगचा पर्याय आहे. 

Updated: Aug 9, 2016, 02:01 PM IST
इनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख मिस झाली का ? तर काय कराल. title=

मुंबई : तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न जर अजून भरला नसेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढवली होती पण तरीही अजून तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरली नसेल तरी तुम्हाला ई-फाइलिंगचा पर्याय आहे. 

इनकम टॅक्स रिटर्नची डेडलाइन तुम्ही मिस केली असेल तरी 31 मार्च, 2017 पर्यंत तुम्ही रिटर्न फाईल करु शकता. पण ही बिलेटेड रिटर्न फाईल मानली जाईल. डेडलाइननंतर टॅक्स रिटर्न फाइल करण्याच्या प्रकियेत कोणताही फरक नाही. फक्त फार्म भरतांना तुम्हाला हे बिलेटेड टॅक्स रिटर्न फाईल आहे असं दाखवावं लागेल. 

डेडलाइन मिस झाल्यानंतर दंड भरुन तुम्ही आयटीआर भरु शकता. जर तुम्ही टॅक्स कॅटेगरीमध्ये येता, तुमचा टीडीएस कापला जातो, अॅडवांस टॅक्स जर तुम्ही भरता यानंतरही जर तुमच्या इनकमवर टॅक्स लागत असेल तर टॅक्सच्या रक्कमेवर एक टक्का सामान्य व्याजसह तुम्ही टॅक्स रिटर्न भरु शकता.

31 मार्च 2017 पर्यंत तुम्ही टॅक्सची रक्कम व्याजासह भरु शकता. पण लक्षात ठेवा जर तुम्ही ही डेडलाईनही मिस केली तर तुम्हाला ५००० पर्यंत दंड लागू शकतो.