विद्यार्थ्याचं मोदींना पत्र, 'अभ्यासापेक्षा तुमची रॅली महत्त्वाची आहे का ?'

अलीराजपूरमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने शाळेच्या बसेस रॅलीमध्ये वापरण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. देवांश जैन याने पत्रात लिहिलं आहे की, ९ ऑगस्टला अलीराजपूरमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या जनसभेसाठी शाळेच्या बसेस बूक केल्या जात आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: Aug 9, 2016, 01:33 PM IST
विद्यार्थ्याचं मोदींना पत्र, 'अभ्यासापेक्षा तुमची रॅली महत्त्वाची आहे का ?' title=

मध्यप्रदेश : अलीराजपूरमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने शाळेच्या बसेस रॅलीमध्ये वापरण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. देवांश जैन याने पत्रात लिहिलं आहे की, ९ ऑगस्टला अलीराजपूरमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या जनसभेसाठी शाळेच्या बसेस बूक केल्या जात आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पत्रात त्याने पुढे लिहिलं आहे की, 'आज माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की, ९ आणि १० ऑगस्टला शाळेत बस नाही येणार. तर मी विचारलं का ? तेव्हा शिक्षकांनी सांगितलं की, शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मस्थळ भाभरामध्ये भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त पंतप्रधान मोदी एका सभेला संबोधित करणार आहे. या सभेत लोकांना घेऊन जाण्यासाठी कलेक्टरने शाळेची बस घेतली आहे. पण मोदी अंकल मला माहित आहे तुम्हाला ऐकण्यासाठी तर लोकं स्वखर्चाने आणि स्वत:च्या वाहनांनी येतात. देश-विदेशात तुम्हाला ऐकण्यासाठी भरपूर लोकं येतात. मी टीव्हीवर तुम्हाला अमेरिकेत भाषण देतांना पाहिलं तेथे पण भरपूर गर्दी होती. मला माहित आहे की तिथे लोक तुम्हाला ऐकण्यासाठी बसमध्ये बसून नव्हते येत. मला तर हे माहित आहे की निवडणुकीच्या काळात तुम्हाला ऐकण्यासाठी लोकं सभागृहात पैसे देऊन येतात.'