भारतात २०२५ पर्यंत पाणी दुर्मिळ - अभ्यास

अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतातील पाण्याची मागणी आणि उपलब्ध स्रोत यांच्यामध्ये मोठी तफावत आहे, म्हणून २०२५ पर्यंत भारत दुर्मिळ पाणी असलेला देश होण्याची शक्‍यता आहे.

Updated: May 24, 2015, 11:36 PM IST
भारतात २०२५ पर्यंत पाणी दुर्मिळ - अभ्यास title=

मुंबई : अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतातील पाण्याची मागणी आणि उपलब्ध स्रोत यांच्यामध्ये मोठी तफावत आहे, म्हणून २०२५ पर्यंत भारत दुर्मिळ पाणी असलेला देश होण्याची शक्‍यता आहे.

एव्हरिथिंग अबाऊट वॉटर या पाण्याचा अभ्यास करणाऱ्या आघाडीच्या संस्थेने हा अभ्यास केला आहे. 'भारतात सध्या उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतांपेक्षा पाण्याची मागणी वाढत असून २०२५ पर्यंत भारत दुर्मिळ पाणी असलेला देश होईल' असे या अभ्यासाच्या अहवालात म्हटले आहे. 

भारतातील जवळपास ७० टक्के पाण्याचे सिंचन हे जमिनीखालून होते आणि ते कमी होत चालले आहे, असेही अहवालातून समोर आले आहे. देशामध्ये पायाभूत सुविधांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याच्या पुनर्वापराचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठी संधी आहे. तसेच भारतातील उद्योग क्षेत्रात २०२० पर्यंत पाण्याचा पुनर्वापर आणि औद्योगिक पाण्यावर प्रक्रियेसाठीही मोठी संधी असल्याचेही अहवालात म्हटले आहे. 

सध्या महाराष्ट्रात पाण्याच्या पुनर्वापरावरील प्रक्रियेसाठी लघु आणि मध्यम गटातील १२०० पेक्षा अधिक कंपन्या काम करत आहेत. तसेच येत्या काही वर्षात भारतामध्ये जल क्षेत्रात १३०० कोटी डॉलरची विदेशी गुंतवणूक अपेक्षित असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.